dcsimg

Fantail flycathcer नाचरा नर्तक मक्षाद 02

Image of Neornithes

Description:

नाचरा मक्षाद White spotted Fantail Flycatcher, Spot-breasted fantail शास्त्रीय नाव: Rhipidura albogularis भारत, थायलंड व व्हियेतनाम या देशात आढळणारा हा पक्षी आहे. भारतात, राजस्थान,मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यात आढळतो. नाचरा हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. याला अनेक नावाने संबोधले जाते. नाचण, नर्तक, न्हावी ही त्याला प्रचलित नावे आहेत. परंतु नाचरा किंवा नर्तक म्हणून त्याला जास्त प्रमाणावर ओळखले जाते. चिमणीसारखा हा दिसणारा पक्षी असून याची शेपटी वर उचललेली असते. शेपूट लांब व पिसारलेल्या अवस्थेत असते. डोक्यावर रांगोळी काढावी तशा पांढऱ्या रेषा असतात. सतत हालचाल करणारा हा पक्षी आपल्या शेपटाची पिसे हवा घेण्याच्या जपानी पंख्यासारखी पसरलेली असतात. गाणे गात-गात आपली शेपटी बंद - उघडी करत असतो. यामुळेच त्याला इंग्रजीमध्ये फॅनटेल म्हणतात. अशावेळी शेपटीच्या पंखांवर छानशी नक्षी पहावयास मिळते. तो एका जागेवर कधीच जास्तवेळ स्थिर बसलेला दिसत नाही. सतत हालचाल करत इकडून तिकडे उड्या मारत असतो. नर्तक अतिशय सुंदर नृत्य करत असतो आणि त्याचबरोबर त्याचे मंजुळ गाणे चालूच असते. काही वेळा चक-चक असा आवाज देखील काढत असतो. झाडा-झुडपात माश्या व किडे पकडून खाण्यासाठी तो सतत उड्या मारत असतो. तो सर्व प्रकारच्या माशा, डास, किडे पकडून खात असतो, त्यामुळे याला माशापकड्या म्हणूनही ओळखला जातो. तो सर्व म्हणून याला ‘नाचरा’ म्हणतात. नर्तक हा रंगाने चिमणीसारखा दिसणारा असतो. गळ्यावर, पोटावर, आणि डोक्यावर पांढरे पट्टे असतात. याची लांबी साधरण १२ ते २१ सेंटीमीटर इतकी असते. शरीर पूर्ण काळे नसते तर किंचित तपकिरी आणि राखी रंगाचे असते. पोटाचा, मानेचा रंग पांढरा असतो. डोक्यावर रांगोळीने काढाव्या अशा तीन चार रेषा असतात. भुवया देखील पांढऱ्या रंगाच्या असतात. याचा विणीचा हंगाम असतो मार्च ते ऑगस्ट. झाडाच्या फांद्यांच्या खाचांमध्ये घरटे बांधतो. गवत, काड्या, धागे जमवून हा पक्षी वाटीसारखे घरटे बांधतो. बाहेरून मात्र कोळीष्टके लावलेली असतात. मादी बहुदा २ ते ३ अंडी घालते.

Source Information

license
cc-by-sa-3.0
copyright
Kamble Vidhin (page does not exist)
original
original media file
visit source
partner site
Wikimedia Commons
ID
047f917dfbcef0a325e1b227ba5e1401